गुरुवार, ७ मार्च, २०१३

ताल परिभाषा आणि व्याख्या

ताल परिभाषा

मात्रा : ज्या आकड्यांनी ताल मोजला जातो त्याला मात्रा म्हणतात

सम : तालाची पहिली मात्र म्हणजे सम. खूण  'X'

काल : तालाचे जे भाग असतात, त्या भागातल्या पहिल्या मात्रेला जर आघात नसेल तर ती मात्रा टाळी न वाजवता दाखवतात, त्याला काल म्हणतात. खूण  'o'

बोल : मात्रा न म्हणता ज्या अक्षरांनी मोजला जातो त्या ला बोल असे म्हण्तात.

व्याख्या

ताल : गायन वादन चालू असताना आपण हाताने जो ठेका धरतो त्याला ताल म्हणतात.

स्वर : गायन वादनासाठी उपयोगी असणाऱ्या नादाला स्वर म्हणतात.

वादी : रागातील मुख्य स्वर. वादी स्वर रागात वारंवर गायला जातो

संवादी : वादीला मदत करणारा स्वर.

स्थायी : गीताचा पहिला भाग.

अंतरा : गीताचा दुसरा भाग.

आरोह : स्वराचा चढता क्रम.

अवरोह : स्वराचा उतरता क्रम.

आलाप : अनेक स्वरांचे गायानाने विस्तारलेले रूप, काही आलाप तालबद्ध असतात तर काही ताल्बद्ध नसतात.

स्वरमालिका / सरगम: तालात बांधलेली स्वररचना.  

बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३

प्रार्थना


रियाज सुरु करण्या आधी म्हणायची प्रार्थाना

सा ग प सां,  गं सां, प ग सा, ध प सा
                                            .  .

सुगम संगीत फक्त स्वर म्हणून सुरुवात करावी

शास्त्रीय संगीत स्वर आणि आकार म्हणून प्रार्थना करावी 

भारतीय शास्त्रिय संगीत

राग

  1. भूप
  2. यमन कल्याण 
  3. कािफ
  4. भैरव 
  5. आह्लया िबलावल

मराठी सुगम संगीत

  1. प्रार्थना देवा तुला 
  2. हासरा नाचारा  
  3. ईथेच आणि या बांधावर 
  4. माझे जीवन गाणे  
  5. मोगरा फुलाला 
  6. तूच करता आणी करविता 
  7. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा 
  8. चल उठ रे मुकुंदा,  झाली पहाट झाली
  9. सांज ये गोकुळी, सावली सावली
  10. नीज रे नीज रे बाळा